Indian Army : भारतीय सैन्य दलातील सातारच्या जवानाला वीरमरण; सेवा बजावत असताना देवदास रजपूत यांना हृदयविकाराचा झटका!
Indian Army Jawan Devdas Rajput Dies of Heart Attack in Rajasthan : देवदास रजपूत हे २०१६ मध्ये भारतीय सैन्य दलामध्ये (Indian Army) नर्सिंग असिस्टंट या पदावर भरती झाले होते. लखनऊ (उत्तर प्रदेश) या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचे पहिले पोस्टिंग जम्मू या ठिकाणी झाले.
दुधेबावी : जावली (ता. फलटण) येथील देवदास दिलीप रजपूत या भारतीय सैन्य दलातील जवानाला राजस्थानमधील नासेराबाद येथे सेवा बजावत असताना हृदयविकाराने (Heart Attack) वीरमरण आले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.