Indian Army Jawan
esakal
कऱ्हाड : अमर रहे, अमर रहे... सोमनाथ सुर्वे अमर रहे... जय हिंद, भारत माता की जय... या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. आज शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास भारतीय सैन्य दलातील (Indian Army) मराठा लाईट इंफन्ट्रीमध्ये (Maratha Light Infantry) कार्यरत असलेले कऱ्हाड तालुक्यातील आबईचीवाडी (जि. सातारा) येथील जवान सोमनाथ शामराव सुर्वे (वय ४७) यांचे पंजाबमधील चंदीगड येथून पार्थिव त्यांच्या गावी आणण्यात आले. तत्पूर्वी त्यांची पाटण तिकाटणे येथून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यासाठी कऱ्हाड तालुक्यातील अबालवृध्दांचा जनसमुदाय लोटला होता.