
उंब्रज : इंदोली- पाल उपसा सिंचन योजनेस ५० मीटर वरून १०० मीटर हेडवर पाणी आरक्षण मिळण्यासाठी प्रस्तावास आज तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील इंदोली, पाल विभागाचा दुष्काळ संपणार आहे. आमदार मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.