
चाफळ (जि. सातारा) : विभागातील तीनही महसूल सजातील तलाठ्यांना 30 किलोमीटर अंतरावरील दुर्गम भागातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वास्तविक तेथे त्यांना जाण्यासाठी तीन तास व येण्यासाठी तीन तास लागणार आहेत. त्यामुळे त्यांना नुकसानीचे पंचनामे करताना अनेक अडचणी येणार असून, त्यातून अनेक शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दमदार पावसामुळे पाटण परिसरातील खरिपाच्या काढणीस आलेल्या सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, भात आदी पिकांचे नुकसान झाले. या अतिवृष्टीमुळे बाधित पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश पाटण येथील प्रांत व वरिष्ठ महसूल अधिकारी यांनी दिलेले आदेश तलाठ्यांना गैरसोयीचे व अडचणीचे ठरणार आहेत.
घाबराचये नाही हे डाॅक्टरांचे वाक्य स्मरणात ठेवले : अलका शिंदे
चाफळ महसुली सजासारखीच परिस्थिती तालुक्यातील इतर ठिकाणी पंचनामे करण्याची परिस्थिती निर्माण करवून ठेवल्याने याबाबत वरिष्ठांचा सावळा गोंधळ सुरू असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये तालुक्यातील अनेक शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित चाफळ येथील सुमारे 300 शेतकऱ्यांचे पचनामे केले होते. मात्र, प्रत्यक्षात मदत आठ ते दहा जणांना मिळाली. तरी वेळीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यासंबंधी पंचनामे करण्यासाठी ज्या-त्या परिसरात असलेल्या तलाठ्यांना तेथील जवळपास असणाऱ्या शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.
Video : नांदगणेतील आजी जपताहेत लोकसंस्कृतीचा ठेवा
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.