कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्यामुळे काहीच फरक पडत नाही- विश्वजीत कदम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vishwajeet Kadam

काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्यामुळे काहीच फरक पडत नाही- विश्वजीत कदम

लोणंद (सातारा) : काँग्रेसच्या जीवावर मोठे झालेले येथील काही नेते मंडळी अन्य पक्षात गेलेत. मात्र नेते गेले म्हणून त्यांच्या मागे सर्वजण गेले असे म्हणता येणार नाही. खंडाळा व सातारा जिल्हयातील सामन्य जनता मात्र आजही कॉंग्रेस सोबत ठाम असल्याचे चित्र आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गावागावात, वार्डात व प्रभागात उसळून, ताकदीने लोकांची कामे केली, लोकांच्या मनात घर केले. तर पक्ष पातळीवरून लागेल ते पाठबळ देण्याचे आश्वासन राज्याचे सहकार, कृषी व सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिले.

हेही वाचा: गोंदवलेत 75 वर्षांची नाट्य महोत्सव परंपरा यंदाही खंडित

काँग्रेसचे जेष्ठ नेते (कै) अॅड. बाळासाहेब बागवान यांच्या येथील निवासस्थानी जावून, त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मंत्री कदम हे येथील शासकीय विश्रामधाम येथे खंडाळा व वाई विधानसभा मतदार संघातीत काँग्रेस कार्यकत्यांशी बोलत होते. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे, खंडाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा.एस.वाय. पवार, उपाध्यक्ष सर्फराज बागवान, सुभाष कोळेकर, लोणंद नगरपंचायतीचे विरोधी पक्ष नेते राजेंद्र डोईफोडे, शैलजा खरात, हेमलता कर्नवर, स्वाती भंडलकर, ऋषिकेश धायगुडे, अतुल पवार, तरिक बागवान, म्हस्कूअण्णा शेळके, दादासाहेब शेळके, जयदीप शिंदे, संभाजीराव साळुंखे, प्रकाश गाढवे, अॅड. हेमंत खरात, दत्तात्रय खरात, रमेश कर्नवर, अॅड. बबलू मणेर, नारायण लोखंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री कदम म्हणाले, गेल्या दिड वर्षात कोरोना काळात डॉक्टर्स, अरोग्य कर्मचारी, महसूल कर्गचारी व पोलिस यंत्रणा यांनी राज्यात जीव धोक्यात घालून काम केले. त्यांच्या मदतीला काँग्रेस कार्यकर्ता उभा होता. याचा अभिमान आहे. ही प्रेरणा कॉंग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विचारातून सर्वांना मिळाली. काळजी करण्याचे कारण नाही मूठभर मावळे घेवून शिवछत्रपतींनी स्वराज्याची लढाई लढल्याचा इतिहास आहे.

माझे वडिल (कै) डॉ. पतंगराव कदम यांनीही दुष्काळी भागातून पुण्यात जावून भारती विद्यापीठ उभारले, आमदार, मंत्री झाले ते काँग्रेसच्या विचामुळेच, काँग्रेस कार्यकार्यांनी जोमाने लोकांची कामे करुन विश्वास कमवावा, त्यांच्या मनात घर निर्माण केले तर पक्षपातळीवरून लागेल ते पाठबळ उभे करू. काँग्रेस कार्यकार्यांची शासकीय स्तरावरची कामे करणास टाळटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. असेही यावेळी त्यांनी सांगीतले.

हेही वाचा: बिबट्याच्‍या भीतीने जिल्‍हाधिकारी कार्यालय आवारात बसविले ट्रॅप कॅमेरे

विराज शिंदे म्हणाले, जिल्हातील काँग्रेस कार्यकर्ता खडतर प्रवासातून प्रास्तापितांशी झुंज देत आहे. आपल्या माध्यमातून सामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका ताकदीने लढणार आहोत. खंडाळा व लोणंदचा नगराध्यक्ष कॉंग्रेसचाच असेल. प्रा.एस.वाय पवार म्हणाले, काँग्रेस टिकली पाहिजे, त्यासाठी कॉंग्रेस पुनर्जीवीत करावी लागेल.

जे काँग्रेस सोडून गेले त्यांची आपण जवळ केलेला पक्ष व काँग्रेसही आपणच चालवायची त्यांची प्रवृती आहे. मात्र त्यांची ही प्रवृत्ती ठेचून काढण्याची गरज आहे. सर्फराज बागवान म्हणाले, खंडाळा तालुक्याच्या प्रश्नांसाठी लोणंदला जनता दरबार भरवावा. आदर्की ते लोणंद रस्त्याचे मंजूर झालेले काम मार्गी लावावे. लोणंद व खंडाळा नगरपंचायत निवडणूकांसाठी पक्षाने काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद देवून नीरा-देवघर व धोम-बलकवडीच्या पोट कालव्यांची पूर्ण व्हावेत.

loading image
go to top