esakal | 'राजू शेट्टींवर आरोप करण्याचा अधिकार सदाभाऊंना कोणी दिला?'
sakal

बोलून बातमी शोधा

jal samadhi andolan 2021

जलसमाधी आंदोलनावर टीका करण्याचा अधिकार सदाभाऊ खोत यांना कोणी दिला?

'राजू शेट्टींवर आरोप करण्याचा अधिकार सदाभाऊंना कोणी दिला?'

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : जलसमाधी आंदोलनावर टीका करण्याचा अधिकार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना कोणी दिला?, असा सवाल नगर येथील प्राचार्य डॉ. अशोकराव ढगे (Dr. Ashokrao Dhage) यांनी केला. ते कऱ्हाडात बोलत होते. खोत यांनी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या टीकेवर केलेल्या आरोपाचा नगर जिल्ह्यातर्फे निषेध करण्यात आला. पुन्हा टीका झाल्यास जशास तसे उत्तरे देण्याचा इशाराही यावेळी दिला आहे.

कोल्हापूर भागात अतिवृष्टी व पुरामुळे (Kolhapur Flood) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांचे प्रपंच उघड्यावर आले आहेत. अनेक हालपेष्टा होत आहेत. शासनाची मदत मिळण्यासाठी माजी खासदार व शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलन करून तो प्रश्न ऐरणीवर आणला. जलसमाधी आंदोलनात जनसमुदाय उपस्थित होता. त्यांना पाठिंबा दिला.

हेही वाचा: NCP च्या आमदार शिंदेंना चुकांच्या परिमार्जनाची संधी

त्या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी ज्यांना पोहता येतं, त्यांनी पाण्यात उड्या मारल्या अशा प्रकारची टीका केली. त्यांनी आंदोलनावर केलेली टीका बिनबुडाची आहे. वास्तविक ती टीका आश्चर्यजनक आणि दिशाभूल करणारी आहे. गुजरात वादळग्रस्तांना हजारो कोटी रुपये पंतप्रधान देतात, मात्र गोवा-महाराष्ट्राला फुटकी कवडी सुद्धा दिली जात नाही, याचा विसर त्यांना सोयीस्करपणे कसा पडला आहे. शेट्टी यांच्या आंदोलनावर वायफळ बडबड करून सदाभाऊ खोत स्वत:चे हसू करून घेत आहेत, यापुढे त्यांना जशास तसे उत्तर नगर जिल्ह्यातून मिळेल, असा इशाराही त्यांनी कऱ्हाडातून दिला.

loading image
go to top