
ढेबेवाडी : आंतरराष्ट्रीय कंपन्यांत विशेषतः जपानशी संबंधित कंपन्यांत काम करण्याची संधी मिळण्याबरोबरच करिअरच्या इतरही नवनवीन संधी प्राप्त करण्यासाठी बारावीनंतर जपानी भाषा शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. मात्र, त्यासाठी लागणारे शुल्क व अन्य काही बाबी ग्रामीण भागातील विद्यार्थी -पालकांसाठी अडचणीच्या ठरतात.