साताऱ्यातील जवान विपुल इंगवले हुतात्मा; 24 जूनला होता लग्नाचा वाढदिवस

भारतीय सैन्यदलात सियाचीन ग्लेशियरमध्ये (बर्फाच्छादित प्रदेश) कार्यरत असताना बर्फ लागल्यामुळे प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम
Jawan Vipul Ingwale of Satara was martyred June 24 wedding anniversary
Jawan Vipul Ingwale of Satara was martyred June 24 wedding anniversarysakal

कोरेगाव : भारतीय सैन्यदलात सियाचीन ग्लेशियरमध्ये (बर्फाच्छादित प्रदेश) कार्यरत असताना बर्फ लागल्यामुळे प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम झाल्यानंतर उपचार सुरू असताना भोसे (ता.कोरेगाव) येथील जवान विपुल दिलीप इंगवले (वय २६) यांना आज पुणे येथे कमांड हॉस्पिटलमध्ये वीरमरण आले. त्यामुळे भोसे व परिसरावर शोककळा पसरली आहे. विपुल हे २०१६ मध्ये भारतीय सैन्यदलात भरती झाले. प्रारंभी गोवा येथे सैनिक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची सिग्नल रेजिमेंटमध्ये नियुक्ती झाली.

सुमारे वर्षभरापूर्वी सियाचीन ग्लेशियरमध्ये कार्यरत असताना त्यांना बर्फ लागल्यामुळे त्यांच्या लहान मेंदूच्या शिरांवर प्रतिकूल परिणाम झाला. सुरुवातीला त्यांच्यावर दिल्ली येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. तेथे प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांना भोसे येथे काही दिवस आणले होते. मात्र, तेथे पुन्हा प्रकृती बिघडू लागल्याने त्यांना पाच ते सहा महिन्यांपूर्वी भारतीय सैन्यदलाच्या पुणे येथील कमांड हॉस्पिटलमधे उपचारार्थ दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांना वीरमरण आले. त्यांच्या मागे पत्नी, नऊ महिन्यांची मुलगी, आई-वडील, दोन बहिणी व भाऊ असा परिवार आहे.

दरम्यान, उद्या (सोमवारी) सकाळी दहाच्या सुमारास विपुल यांचे पार्थिव भोसे येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते १ या दरम्यान लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती भोसेचे सरपंच गणेश भोसले यांनी दिली.

भोसले कॉलेजचे बेस्ट कॅडेट

कोरेगाव येथे डी. पी.भोसले कॉलेजमध्ये शिकत असताना विपुल इंगवले हे एनसीसीचे बेस्ट कॅडेट होते. एनसीसीच्या माध्यमातून त्यांना दिल्ली येथील आरडी परेडमध्ये सहभागी होण्याचा मानही मिळाला होता.

लॉकडाउनमध्ये लग्न, २४ रोजी ॲनिव्हर्सरी

कोरोना साथीच्या काळामधील लॉकडाउनमध्ये २०१९ मध्ये विपुल इंगवले यांचे लग्न झाले होते. येत्या २४ जून रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com