बिजवडी : राज्यातील महायुती सरकारमधील सर्वच विभागांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार चांगले काम करून १०० दिवसांत साधलेल्या उद्दिष्टपूर्तीने महाराष्ट्राला वेगाने विकासात पुढे न्यायचे काम केले आहे. मोठी व्याप्ती असलेल्या ग्रामविकास विभागानेही या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने काम करताना घरकुले, रस्ते, तीर्थक्षेत्र विकासासह ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या सर्वच योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. यापुढेही मुख्यमंत्री आणखी उद्दिष्ट देणार आहेत, ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आमच्या महायुती सरकारचे सर्वच विभाग जोमाने काम करतील, असा विश्वास ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी व्यक्त केला.