esakal | गुढीपाडव्याचा मुहूर्तावरील उलाढाल यंदाही ठप्पच; पंढरपूरातील साखरेच्या गाठ्यांना साता-यात मागणी

बोलून बातमी शोधा

गुढीपाडव्याचा मुहूर्तावरील उलाढाल यंदाही ठप्पच; पंढरपूरातील साखरेच्या गाठ्यांना साता-यात मागणी

दरम्यान, लॉकडाउनच्या भीतीने नागरिकांनी आजही (मंगळवार) जीवनाश्‍यक वस्तू खरेदीसाठी येथील बाजारपेठेत गर्दी केली आहे. बहुतांश किराणा, भुसार मालांच्या दुकानासमोर खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा आहेत. पाडव्यासाठी आवश्‍यक असणारी साखरेची गाठ्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांचा हिरमाेड झाल्याचे दिसून आले.

गुढीपाडव्याचा मुहूर्तावरील उलाढाल यंदाही ठप्पच; पंढरपूरातील साखरेच्या गाठ्यांना साता-यात मागणी
sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने शासनान केलेल्या मिनी लॉकडाउनमुळे सलग दुसऱ्या वर्षी नागरिकांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुकानात जाऊन सोन्यासह अन्य वस्तू खरेदी करता येणार नाही. यावेळेस काही व्यावसायिकांनी ऑनलाइन नाेंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे तर बहुतांश व्यावसायिकांनी वस्तुंची विक्री काही कालावधीनंतरच हाेईल असे स्पष्ट केल्याने ग्राहकांत थोडी नाराजी आहे. लॉकडाउनचा बाजारपेठेच्या उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या भीतीने साताऱ्यातील बाजारपेठेत आज (मंगळवारी) देखील विविध वस्तु घेण्यासाठी गर्दी आहे. जीवनाश्‍यक वस्तू खरेदी करण्याबरोबरच पाडव्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यावर सातारकरांचा भर असल्याचे दिसून आले.
 
साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक आहे. या दिवशी सोने, वाहनांसह फ्लॅट, प्लॉट, शेत जमिनीसह घरगुती साहित्यांची खरेदी होते. सर्वाधिक खरेदी सोने, चांदी व घरांची होते; पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे केलेल्या लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर सर्व काही बंद आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून, पाचशेंपासून एक हजारांवर रुग्ण दिवसाला सापडत आहेत. त्यामुळे शासनाने मिनी लॉकडाउन केले आहे. परिणामी अत्यावश्‍यक सुविधा वगळता सर्व काही बंद आहे. 

त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने अथवा वस्तूच्या खरेदीवर परिणाम हाेणार आहे. दुकाने बंद असल्याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणारी आर्थिक उलाढाल ठप्प हाेण्याची भिती व्यक्त हाेत आहे. त्याचा सर्वाधिक फटका सोन- चांदीसह वाहन व्यावसायिकांना बसला आहे. घर व मोकळ्या जागेसह शेतजमिनी खरेदी करण्यासाठी आधीच बुकिंग केलेले आहे. त्यांना मात्र, ऑनलाइन खरेदीचा अवलंब करावा लागेल. दस्त नोंदणीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचा फायदा बांधकाम व्यावसायिक व इतरांना होणार आहे.
 
दरम्यान, लॉकडाउनच्या भीतीने नागरिकांनी आजही (मंगळवार) जीवनाश्‍यक वस्तू खरेदीसाठी येथील बाजारपेठेत गर्दी केली आहे. बहुतांश किराणा, भुसार मालांच्या दुकानासमोर खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा आहेत. पाडव्यासाठी आवश्‍यक असणारी साखरेची गाठ्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांचा हिरमाेड झाल्याचे दिसून आले.

लाॅकडाउन हाेईल या शक्यतेने साखरेच्या गाठ्यांचा माल कमी करण्यात आला. त्यामुळे साखरेच्या गाठ्यांचा तुटवडा निर्माण झाला. साेमवारी रात्री आम्ही पंढरपूरहून गाठ्या मागविल्या. त्याची आज विक्री हाेत आहे अशी माहिती येथील मिठाईचे व्यापारी बन्सीलाल (बबलू) माेदी यांनी दिली. 

काेणत्याही क्षणी लाकडाउनचा निर्णय झाल्यास परिस्थिती हाताळण्यास आम्ही सज्ज आहाेत 

Edited By : Siddharth Latkar