सातारा जिल्हा परिषदेत नाेकरीची संधी; 18 जूलैपर्यंत अर्ज करा

सातारा जिल्हा परिषदेत नाेकरीची संधी; 18 जूलैपर्यंत अर्ज करा

सातारा : जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे निराकरण करण्यासाठी व सदृश्‍य परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने विविध पदांची भरती करण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
आता बोगस उद्योगांना असा बसणार चाप 
 
कंत्राटी पद भरतीमध्ये फिजिशियन, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, क्ष- किरण तंत्रज्ञ, इसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, डाटा ऑपरेटर यांचा समावेश आहे. आरोग्यसेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय, तसेच कोरोना केअर सेंटर येथे असेल.

सातारा जिल्ह्यातील 'या' तालुक्यात पोलिसांनी वाजवला वऱ्हाडाचा बॅंड

नवीन विंचवाचा फलटणमध्ये शोध, निओस्कॉरपिओपस फलटणेन्सीस असे नामकरण


कोरोना साथीचा संसर्गजन्य आजार नियंत्रणात येईपर्यंत शासकीय, महानगरपालिका, नगरपालिका सेवा क्षेत्रामधून निवृत्त झालेले, बॉंड पूर्ण झालेले व इतर आरोग्य सेवा देण्यास सक्षम असणाऱ्या डॉक्‍टर्स, परिचारिका व इतर पदांची कंत्राटी पद्धतीने पदे भरावयाची आहेत. त्यासाठी पदभरती जाहिरात अटी शर्तीसह zpsatara.gov.in या संकेतस्थळावर पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करावयाची पद्धत- ऑनलाइन असेल. ऑनलाइन अर्ज सादर करावयाची शेवटची मुदत 18 जुलैला सायंकाळी सहा वाजेपर्यंत असेल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी http://bit.ly.NHMSTR या लिंक, तसेच क्‍यूआर कोडचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

संपादन - सिद्धार्थ लाटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com