esakal | सातारा जिल्ह्यात नाेकरीची माेठी संधी; नर्स, वॉर्डबॉय, वैद्यकीय अधिकारी हवेत
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा जिल्ह्यात नाेकरीची माेठी संधी; नर्स, वॉर्डबॉय, वैद्यकीय अधिकारी हवेत

यातून नव्याने वाढणाऱ्या रुग्णांवर उपचार करणे सोपे होणार आहे. पण, आता जिल्हा प्रशासनाला नर्सेस, वॉडबॉय, टेक्‍निशियन, वैद्यकीय अधिकारी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

सातारा जिल्ह्यात नाेकरीची माेठी संधी; नर्स, वॉर्डबॉय, वैद्यकीय अधिकारी हवेत

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उपचार करण्यासाठी बेड कमी पडत आहेत. पण, जिल्हा प्रशासनाने तातडीने भूमिका घेऊन जिल्ह्यातील विविध शासकीय तसेच इतर खासगी 30 हॉस्पिटलच्या माध्यमातून 700 ते 800 बेड उपलब्ध करण्याची तयारी केली आहे.
 
पण, यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी येत्या आठवडाभरात दीड ते दोन हजार कंत्राटी नर्स, वॉर्डबॉय व वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. यातून या वाढीव बेडसाठी मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

जिल्हावासीयांसाठी गृहराज्यमंत्री देसाईंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ही मागणी! 

कोविडचा संसर्ग आता ग्रामीण भागात सर्वाधिकपणे वाढू लागला आहे. समूह संसर्गामुळे रुग्णसंख्याही वाढली आहे. आतापर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या 18 हजार 500 झाली आहे. तर साडेसात हजार रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड कमी पडू लागल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने खासगी रुग्णालये अधिगृहित करण्यासोबतच सातारा व कऱ्हाड येथे 450 तसेच खासगी रुग्णालयांतील 300 असे 700 ते 800 बेड उपलब्ध होत आहेत. जरी हे बेड उपलब्ध होणार असले तरी या बेडसाठी लागणारा आरोग्य विभागाचा स्टाफ उपलब्ध नाही. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंत्राटी पध्दतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनावर मात केल्यानंतर मुंढेचा टोला कुणाला? 

यासाठी येत्या एक ते दोन दिवसांत टेंडर निघणार आहे. प्रत्यक्षात या 700 बेडसाठी सुमारे तीन ते चार हजार कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी लागणार आहेत. पण, इतका स्टाफ मिळणे अवघड आहे. त्यामुळे दीड हजार स्टाफ कंत्राटी पध्दतीने आगामी चार ते पाच महिन्यांसाठी प्रशासन घेणार आहे. मुळात पुणे, मुंबई, सांगली व इतर जिल्ह्यांत कंत्राटी पध्दतीने स्टाफ मिळालेला नाही. तेथे कंत्राटी पध्दतीने 
भरतीप्रक्रिया राबवूनही त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता सातारा जिल्हा प्रशासनापुढे नव्याने उपलब्ध बेडसाठी लागणारा स्टाफ उपलब्ध करणे हे मोठे आव्हान आहे.

कोरोना लढाईत प्रशासनाला हवी नेत्यांची साथ; कऱ्हाडकर शासनाच्या भरवशावर!
 
कऱ्हाड, सातारा व खासगी हॉस्पिटल्स अधिगृहित करून 700 ते 800 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. यातून नव्याने वाढणाऱ्या रुग्णांवर उपचार करणे सोपे होणार आहे. पण, आता जिल्हा प्रशासनाला नर्सेस, वॉडबॉय, टेक्‍निशियन, वैद्यकीय अधिकारी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. 

कष्टकरी माणसं लय भारी ! 

बेड व मनुष्यबळ... 

जिल्ह्यात उपलब्ध होणारी बेडसंख्या : 700 ते 800 
त्यासाठी लागणारे मनुष्यबळ : तीन ते चार हजार 
कंत्राटी भरतीतून उपलब्ध होणारे : दीड हजार 
केरळहून आलेले मनुष्यबळ : 30

सातारकरांनो.. ऑक्‍सिजनची कमतरता भासतेय, मग आम्हाला फोन करा

Edited By : Siddharth Latkar