फलटण तालुक्यातील अपहरण झालेले दहा महिन्यांचे बाळ सापडले विहरीत

फलटण तालुक्यातील अपहरण झालेले दहा महिन्यांचे बाळ सापडले विहरीत
Updated on

सातारा : फलटण तालुक्यातील पूर्व भागातील मोठ्या बाजारपेठेचे गाव असणार्‍या काळज येथून दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या दहा महिन्यांच्या बाळाचा मृतदेह विहिरीत सापडला आहे. यामुळे ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त हाेत आहे.

आज (गुरुवार) सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. परिणामी ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. दोन दिवसांपुर्वी अवघ्या दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाले हाेते. सातारा पोलिसांच्या माध्यमातून 22 अधिकारी यांची 12 पथके तयार करण्यात आली हाेती. आज (गुरुवार) सकाळच्या प्रहरी भगत यांच्या घरापासून 500 फूट अंतरावर असलेल्या एका विहरीत बाळाचा मृतदेह फुगुन वर आल्याचे आढळले

अपहरण झालेल्या बाळाच्या शोधार्थ 22 प्रमुख अधिका-यांची 12 पथके; अधीक्षक सातपुतेंचे नागरिकांना आवाहन 

घटनास्थळी पाेलिस पाेहचले असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान आज (गुरुवार) बाळाचा मृतदेह सापडल्याने या घटनेचे गूढ वाढले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mahimangad Fort on the Path to Preservation; State-Protected Status Likely Soon
Karad Airport Modernization Faces Delays; Safety and Development Issues Under Scrutiny
Political Strategy in Full Swing Ahead of Council Polls; BJP Focuses on Securing Votes
Koyna Dam Water Levels Reach Critical Stage, Irrigation Withdrawals Stopped
Marathi News Esakal
www.esakal.com