छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघाेषाने सातारा दुमदुमला; युवक काश्मीरला रवाना

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघाेषाने सातारा दुमदुमला; युवक काश्मीरला रवाना

नागठाणे (जि. सातारा) : कन्याकुमारी ते श्रीनगर हे अंतर पायी धावणाऱ्या दोन युवकांचा आज (मंगळवार) साताऱ्यात सत्कार करण्यात आला. युवकांच्या या आगळ्या उपक्रमाची "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद होणार आहे. राजस्थानील रामरतन अन्‌ हरियानातील संजयकुमार अशी या ध्येयवेड्या युवकांची नावे आहेत.
 
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत कन्याकुमारी येथून त्यांनी आपली पायी दौड सुरू केली आहे. अकरा जानेवारीस त्यांनी आपल्या उपक्रमास प्रारंभ केला. चार हजार 431 किलोमीटरचा प्रवास करून ते आठ मार्चला काश्‍मीर येथे पोचणार आहेत.

अकरा राज्य, 91 मोठी शहरे अन्‌ एक हजारपेक्षा अधिक खेड्यांमधून त्यांचा प्रवास होत आहे. आज हे ध्येयवेडे युवक सातारा येथे दाखल झाले. आजी- माजी सैनिक व नौ सैनिक संघटनेचे पदाधिकारी सूर्यकांत पडवळ, प्रमोद कणसे, अश्‍पाक पटेल, राजेंद्र निकम यांनी सातारकरांच्यावतीने या युवकांचा येथील बॉंबे रेस्टॉरंट चौकात गौरव केला. या सत्कार सोहळ्यास आजी-माजी सैनिक, तसेच नौ सैनिक उपस्थित हाेते. त्यानंतर हे दाेन्ही युवक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघाेषाने रवाना झाले.

शिक्षक संघटनेत चंगळवादी नेत्यांची चलती; बलवंत पाटलांची खरमरीत टीका

महू धरणाच्या वळणावर एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर; 20 प्रवासी बचावले

उदयनराजेंनी साेडविलेला प्रश्न पुन्हा उदभवला; व्यावसायिकांचा पालिकेस सात दिवसांचा अल्टीमेटम
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com