
मलकापूर : महामार्ग ओलांडताना ट्रकने दिलेल्या धडकेत पादचारी जागीच ठार झाला. ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने पादचाऱ्याची रात्री उशिरापर्यंत ओळखही पटली नव्हती. राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड-सातारा मार्गिकेवर येथील पंजाब हॉटेलसमोर मंगळवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, घटनास्थळावरून ट्रकचालक पसार झाला.