AI-Generated Tiger Video Creates Panic in Karad
esakal
कऱ्हाड : एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शहरात वाघाचे अस्तित्व असल्याची अफवा पसरविणाऱ्या एकावर गुन्हा दाखल झाला. समाज माध्यमावर आलेल्या चित्रफितीची दखल घेत वन विभागाने (Forest Department) कारवाई केली. ओमकार खंडू बोबाटे (रा. मुजावर कॉलनी) असे अफवा पसरविणाऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे.