Satara News : विमानतळ परिसरातील उंच टॉवर, बांधकामे तातडीने काढा; सातारा प्रशासनाला अधिकाऱ्यांच्या सुचना

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कऱ्हाड (जि.सातारा) येथील विमानतळाची आज पाहणी केली. यावेळी त्यांनी विमानतळ परिसरातील उंच टॉवर आणि उंच बांधकामे तातडीने काढावे अशा सुचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.
karad airport near removes tower and construction site order to satara administration officials
karad airport near removes tower and construction site order to satara administration officialsSakal
Updated on

Satara News : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कऱ्हाड (जि.सातारा) येथील विमानतळाची आज पाहणी केली. यावेळी त्यांनी विमानतळ परिसरातील उंच टॉवर आणि उंच बांधकामे तातडीने काढावे अशा सुचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. यावेळी त्यांनी विमानतळ विस्तारीकरणासाठीही अनुकुलता दर्शवली आहे.

कऱ्हाड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. सातारा जिल्ह्यातील पहिले विमानतळही कऱ्हाडलाच आहे. पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठिकाणे कऱ्हाड परिसरात उपलब्ध आहेत. या परिसरातील पर्यटन वाढीसाठी कऱ्हाड विमानतळचे विस्तारीकरण आणि विकास करणे आवश्यक असल्याचे सरकारचे मत झाल्याने त्या कामांसाठी सुधारीत प्रशासकीय वित्तीय मान्यते अंतर्गत २२१ कोटी ५१ लाखांच्या खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असा अद्यादेश राज्य शासनाच्या अव्वर सचिव राजश्री हिर्लेकर यांनी जारी केला आहे.

karad airport near removes tower and construction site order to satara administration officials
Pune : मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त नीलम गोऱ्हे यांनी ६० किलोचा मोदक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस केला अर्पण

त्यानुसार येथील विमानतळाच्या विकासासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याअंतर्गत आज महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, अतिरीक्त जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांनी येथील विमानतळाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार विजय पवार, विमानतळ व्यवस्थापक कृणाल देसाई उपस्थित होते. यावेळी अतिरीक्त जिल्हाधिकारी नलावडे, तहसीलदार पवार आणि विमानतळ व्यवस्थापक देसाई यांनी विमानतळाच्या सद्यस्थितीची माहिती दिली.

यावेळी उपाध्यक्ष पांडे यांनी विमानतळ परिसरातील उंच टॉवर आणि उंच बांधकामे पाहुन चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी व्हीआयपी दौऱ्यावेळी या टॉवर आणि उंच इमारतीमुळे धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी धोका टाळण्यासाठी संबंधित टॉवर आणि उंच बांधकामे तातडीने काढावे अशा सुचना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांनी विमानतळ विस्तारीकरणासाठीही अनुकुलता दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com