

Satara
esakal
पाटण: कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे, तर कऱ्हाड- चिपळूण महामार्गाचे कामही सध्या चालू आहे. वाजेगाव हद्दीत महामार्ग खचल्याने धोका निर्माण झाला असून, या मार्गावरील वाहतूक बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ठेकेदार कंपनीने या मार्गावरील काम निकृष्ट केल्याचा आरोप वाहनधारकांमधून होत आहे.