
कऱ्हाड : शहरातील वाहतूक आराखड्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. वाहतूक आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिस व पालिका समन्वयातून काम होताना दिसत नाही. आराखडा करताना शहरातील लोकसंख्येसह वाहनांची संख्येचा विचारच झाला नाही. त्यामुळे आराखड्याचे मूळ स्वरूपच बदलावे लागणार आहे. आराखड्यात समस्या पाहून उपाय गरजेचे आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीला अडचणीच्या ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कायमचा इलाज होणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणांसह फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाईची गरज आहे.