अवैधरित्या नळ कनेक्‍शन घेणाऱ्यांवर कडक कारवाई : मुख्याधिकारी डाके

अवैधरित्या नळ कनेक्‍शन घेणाऱ्यांवर कडक कारवाई : मुख्याधिकारी डाके
Updated on: 

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरातील अवैध नळ कनेक्‍शन घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली. पालिकेच्या हद्दीत चोरून नळ कनेक्‍शन घेणे किंवा मीटर न बसविण्यासह पाणी चोरण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. त्या विरोधात पालिकेने कारवाईचा इशारा दिला आहे. 

श्री. डाके म्हणाले, "पाण्याची चोरी रोखण्यासाठी पालिकेव्दारे येत्या तीन महिन्यांत प्रत्येक नळ कनेक्‍शनची तपासणी होणार आहे. पाणी कनेक्‍शन अनधिकृत आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नागरिकांनी आसपास कोणी चोरीचे पाणी वापरत असल्यास ते निदर्शनास आणून द्यावे. अनधिकृत नळ कनेक्‍शनधारकांनी 31 डिसेंबरपर्यंत कनेक्‍शन अनधिकृत असेल तर ते नियमित करायचे आहे. इच्छुकांनी दंड भरून घेऊन कनेक्‍शन नियमित करून घ्यावे. त्यानंतर संबंधित पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

women hockey gold medal
udaysinh patil undalkar
Sangli District Bank Election
Panchayat Samiti members discuss drought conditions and irrigation issues in Walwa taluka
Marathi News Esakal
www.esakal.com