Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

उसाच्या शेतात लपलेल्या सराईत सोनसाखळी चोराला श्वान पथकातील ‘जॅक’ने हुडकले; कऱ्हाड तालुका पोलिसांची संयुक्त कारवाई
Police dog Jack tracks down thief hiding in sugarcane.

Police dog Jack tracks down thief hiding in sugarcane.

Sakal

Updated on

कऱ्हाड ः कऱ्हाड (जि.सातारा) तालुक्यातील दुशेरे येथील शेतात जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारास तालुका पोलिसांनी अटक केली. उसाच्या शेतात लपलेल्या रेकॉर्डवरील संशयित चोराचा माग सातारा श्वान पथकातील ‘जॅक’ या श्वानाने घेत त्याला शोधून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वैभव विठ्ठल कोठावळे (वय २७, रा. माळवाडी- मजले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे संशयिताचे नाव असल्याची माहिती कऱ्हाड तालुका पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com