
कऱ्हाड : बनावट सोन्याच्या व्यवहारासाठी कऱ्हाड (जि.सातारा) शहर परिसरात आलेल्या टोळीचा पर्दाफार्श करण्यात कऱ्हाड शहर पोलिसांना यश आले आहे. सोने विकत घेणाऱ्या सोनाराच्या सतर्कतेने आणि पोलिसांच्या तत्परतेने हा प्रकास उघडकीस आला असुन याप्रकणी तिघांना ताब्यात घेण्यात आले. संबंधित तिघे बनावट सोन्याची बिस्कीटे विक्रुन तब्बल 50 लाखांची फसवणूक करण्याच्या तयारीत होते. गोविंद एकनाथराव पदातुरे (रा. अहमदपूर, जि. लातूर), सर्जेराव आनंदा कदम (रा. पिसाद्री, कोल्हापूर) व अधिक आकाराम गुरव (रा. म्हासुर्णे, खटाव) अशी याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयीतांची नावे असल्याची माहिती कऱ्हाड शहर पोलिस निरीक्षक राजु ताशीलदार यांनी दिली.