
कऱ्हाड : पुणे- बंगळूर महामार्गालगत गोटे (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत हॉटेल फर्नशेजारी असलेल्या गॅस पाइपच्या ढिगाला गुरुवारी अचानक आग लागली. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. आकाशात उठलेले धुराचे लोट पाहून महामार्गावरून जाणारी वाहनेही काही काळ थांबली. पालिका व कृष्णा हॉस्पिटलच्या अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.