
कऱ्हाड : शहराची लोकसंख्या लाखाच्या जवळपास गेली आहे. शहरात वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, वाहनांची रस्त्यावरच दाटी होत आहे. त्या तुलनेत रस्त्यांची रुंदी वाढली नाही. त्यामुळे एखाद्यावेळी आग लागल्यास तिथपर्यंत अग्निशमन बंब पोचणे जिकिरीचे बनते.