Woman assaulted : विवाहाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार; एकावर गुन्हा दाखल
Karad News : संतोष साठे याने संबंधित महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तिच्या नकळत अश्लील व्हिडिओ, फोटो काढून बदनामी तसेच मुलाला आणि नातवाला ठार मारण्याची धमकीही त्याने दिली.
कऱ्हाड : विवाहाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष यशवंत साठे (वय ५०, रा. म्हासोली) असे त्याचे नाव आहे.