
-अमोल जाधव
शेणोली : पदवीचे शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता कोडोली (ता. कऱ्हाड) येथील माऊली मोहन जगताप या युवकाने नातेवाइकांच्या साथीने शेतीपूरक दुग्ध व्यवसायाचा मार्ग निवडला. या व्यवसायात नवनव्या कल्पकता, परिश्रम, सातत्य राखत, तसेच कुटुंबीयांच्या भक्कम साथीने कमी कालावधीत व्यवसाय फुलवला. बघता- बघता कऱ्हाड शहरात त्यांच्या वात्सल्य दुधाचा ब्रँडही तयार केला आहे.