इथे पैसे दिल्याशिवाय हलत नसे कागद!

इथे पैसे दिल्याशिवाय हलत नसे कागद!
Updated on

कऱ्हाड : येथील रेकॉर्डरूममध्ये हात ओले केल्याशिवाय दाखलेच मिळत नसल्याच्या दबक्‍या आवाजात सुरू असलेल्या चर्चेचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईने बुरखा फाटला आहे. तेथे पैसे दिल्याशिवाय कागदच हालत नाही अशी स्थिती होती. परंतु, तक्रार करण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. मात्र, एका शेतकऱ्याने दाखवलेल्या हिमतीमुळे झालेली भांडाफोड महसूल विभागाला विचार करायला लावणारी आहे. नडलेले शेतकरी, नागरिकांना उताऱ्यासाठी अडवणाऱ्यांचा आता तरी बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

जुने सातबारा उतारे, फेरफार आदी दस्तऐवजांची जेव्हा न्यायालयीन अथवा इतर कामकाजासाठी गरज असते, अशा वेळी शेतकरी, नागरिक रेकॉर्डरूमशी संपर्क साधतात. तेथे गेल्यावर पहिल्यांदा कोणीही लवकर दाद घेत नाही. कारण तेथे "काम जास्त आणि कर्मचारी कमी' अशी स्थिती आहे. त्यासाठी खासगी तत्त्वावरील युवकही तेथे कार्यरत आहेत. तेथे गेल्यावर कोणाची तरी ओळख, वशिला असल्याशिवाय तातडीने काम होत नाही. सामान्यांना नियम वेगळे आणि वशिल्याच्यांना नियम वेगळे, अशी स्थिती आहे. सामान्यांना अर्ज भरून द्या, त्याला स्टॅम्प तिकीट लावा आणि चार-पाच दिवसांनंतर भेटा, असे सांगितले जाते. ही कार्यवाही पूर्ण केल्यावरही वेळेमध्ये उतारे, फेरफार मिळत नाहीत. त्यात वेळ वाया जाऊ नये आणि कामही लवकर व्हावे, यासाठी लोकच तेथे पैसे देवून दाखले घेतात.

लोकांनीच लावलेली ही सवय अनेकदा सर्वसामान्यांच्या अंगलट येते आणि त्यांचे काम प्रलंबित राहते. पैसे देण्यामुळे तेथे ते दिल्याशिवाय कामच होत नाही, असा शिरस्ताच तेथे तयार झाला. त्यामुळे अनेक दिवसांची ही खदखद होती. त्याची दबक्‍या आवाजात चर्चा सुरू होती. मात्र, त्यासाठी तक्रार करण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. त्याचे धाडस एका शेतकऱ्याने दाखवले आणि रेकॉर्डरूममधील आर्थिक तडजोडीचा भांडाफोड झाला. तेथे एका फेरफार उताऱ्याच्या नकला देण्यासाठी 300 रुपयांची लाच घेताना कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंध खात्याने ताब्यात घेतले. त्यामुळे तेथे पैसे दिल्याशिवाय कागदच हालत नाही, हे स्पष्ट झाले. त्यातून बोध घेऊन महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नडलेल्या शेतकऱ्यांना, नागरिकांना उताऱ्यासाठी अडवणाऱ्यांचा आता तरी बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. 


सर्वसामान्यांना आता तरी किंमत द्या! 

सर्वसामान्य, शेतकरी, नागरिक जुने उतारे, फेरफार काढण्यासाठी रेकॉर्डरूममध्ये गेल्यावर त्यांना कवडीचीही किंमत दिली जात नाही. तेथे ज्याचा वशिला त्याचेच चालते आणि इतरांनी हेलपाटे मारायचे, अशीच स्थिती आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा बांध फुटण्याअगोदर वरिष्ठांनीच याकडे लक्ष देऊन सर्वसामान्यांना सन्मानाची वागणूक देण्याची गरज आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara City Bus Service Gets Green Signal 10 Mini Electric Buses Ordered After Sakal Campaign Know Proposed Routes
Doctor Dies During Treatment In Satara Amid Alleged Gun License Fitness Certificate Pressure Action Demanded
MBBS Success Story Sahil Jadhav From Valvan Village Achieves Doctor Dream Through Hard Work And Family Support
Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence
Marathi News Esakal
www.esakal.com