esakal | स्वच्छ सर्वेक्षणात कऱ्हाडला 'या' मुळेच देशात पहिला क्रमांक मिळाला : नगराध्यक्षा रोहिणी शिंदे
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छ सर्वेक्षणात कऱ्हाडला 'या' मुळेच देशात पहिला क्रमांक मिळाला : नगराध्यक्षा रोहिणी शिंदे

कऱ्हाड प्रथम क्रमांकावर, सासवड पालिका दुसऱ्या, तर लोणावळा पालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात पहिला क्रमाक जाहीर होताच पालिकेत जोरादार आतषबाजी झाली. 

स्वच्छ सर्वेक्षणात कऱ्हाडला 'या' मुळेच देशात पहिला क्रमांक मिळाला : नगराध्यक्षा रोहिणी शिंदे

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड : स्वच्छ सर्वेक्षण 2020 स्पर्धेमध्ये एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरात कऱ्हाड पालिकेने देशात पहिला क्रमांक पटकवला. त्याची घोषणा केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्ली येथे जाहीर केला. कोरोनामुळे ऑनलाइन पद्धतीने त्या पुरस्कारांची घोषणा अन्‌ वितरणही झाले. पुरस्कार जाहीर होताच पालिकेत आनंदोत्सव साजरा झाला. कर्मचाऱ्यांनी फटाक्‍यांची आतषबाजीही केली.
दहावीतील गुणवंतांना उदयनराजे म्हणाले... 
 
कोरोनामुळे पुरस्काराचे ऑनलाइन वितरण झाले. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव महेश पाठक, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी मुंबईत पुरस्कार स्वीकारला. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणच्या स्पर्धेचा निकाल केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जाहीर केला. एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये महाराष्ट्राचा शिक्कामोर्तब झाला आहे.

महिलांवरील अत्याचारातील संशयितांना जामीन नको - चित्रा वाघ 

हिप हिप हुर्ये... स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कऱ्हाड पालिका देशात अव्वल  

कऱ्हाड प्रथम क्रमांकावर, सासवड पालिका दुसऱ्या, तर लोणावळा पालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात पहिला क्रमाक जाहीर होताच पालिकेत जोरादार आतषबाजी झाली. पालिका कर्मचाऱ्यांनी साखर वाटून आनंद साजरा केला. पालिकेचे यश सांघिक आहे. शहरातील प्रत्येक घटकाने त्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच पुरस्कार प्राप्त झाला आहे अशी भावना नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी व्यक्त केली.

कऱ्हाडला पोर्टेबल व्हेंटिलेटरद्वारे दोघांना जीवदान, पालिकेकडून घरपोच ऑक्‍सिजन

तुमच्या भागात काेणत्या दिवशी पाणी येणार नाही वाचा सविस्तर

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top