कऱ्हाडकरांना मिळणार दिलासा? पालिकेची उद्या अर्थसंकल्पीय बैठक

कऱ्हाडकरांना मिळणार दिलासा? पालिकेची उद्या अर्थसंकल्पीय बैठक
Updated on

कऱ्हाड ः पालिकेत स्वच्छ सर्वेक्षणाच्या घाईगडबडीत अर्थसंकल्पीय सभेची लगबग दिसते आहे. कोरोना काळात कोणतीही करवाढ नसलेले तब्बल दोन कोटी आठ लाख 90 हजारांचे शिलकी अंदाजपत्रक यंदा पालिका सादर करणार आहे. त्यात पाणी व घरपट्टी न वाढवता पालिकेने केवळ छत्रपती शिवाजी स्टेडियमची भाडेवाढ केली आहे.

पालिकेच्या गुरुवारच्या (ता. 25) अर्थसंकल्पीय बैठकीत शिलकी अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. एकीकडे पालिकेने शिलकी अंदाजपत्रक तयार केले असले, तरी शहरातील 20 हजार मिळकतधारकांकडून तब्बल 18 कोटी 18 लाखांच्या करवसुलीचेही आव्हान पेलावे लागणार आहे. त्याचेही पालिकेने नियोजन केले आहे.

कॉलर उडवणारे शांत बसलेले आहेत तर मिशीला पिळ मारणारे घरात
 
पालिकेच्या यंदाच्या नफा-तोटा ताळेबंदाच्या महसुली अर्थसंकल्पामध्ये जमा बाजूला एकूण 72 कोटी 11 लाख 35 हजार 328 रुपये आहेत. त्यातील 55 कोटी 99 लाख 66 हजार खर्ची आहेत. 16 कोटी 11 लाख 68 हजार शिलकी आहेत. त्यासोबतच पालिकेच्या भांडवली अर्थसंकल्पात तब्बल दोन कोटी आठ लाख 90 हजार शिलकी आहेत. तेच अंदाजपत्रक पालिका सादर करणार आहे. 62 कोटी 67 लाख 85 हजारांच्या जमेतील तब्बल 60 कोटी 58 लाख 94 हजार खर्ची आहेत. त्यामुळे पालिका यंदा शिलकी अंदाजपत्रकावर पुढे जाणार आहे. पालिका शिलकी अंदाज पत्रक मांडणार आहे. पालिकेला यंदाही कोरोनासारख्या महामारीमुळे करवसुलीचे मोठे आव्हान आहे. शहरातील तब्बल 20 हजार 44 मिळकतधारकांडून 18 कोटी 18 लाख 70 हजारांच्या कराची वसुली आहे. त्यात मागील वर्षा कोरोनामुळे न झालेल्या वसुलीचा बोजाही यंदा असणार आहे. 

...अशी आहे करवसुली 

शहरातील मिळकतधारकांमध्ये 13 हजार 602 घरांच्या, तर सहा हजार 442 कमर्शियल मिळकती आहेत. त्यांच्याकडून आजअखेर पालिकेला सात कोटी 85 लाख वसूल झाले आहेत. मार्चअखेर दहा कोटी 32 लाखांची वसुली करावयाची आहे. मागील वर्षाची थकीत वसुली सहा कोटी 72 लाख रुपये आहे. त्यात कोरोनामुळे थकीत कराची रक्कम चार कोटी, तर दर वर्षाची थकीत दोन कोटी 72 लाख आहे. त्यासाठी शहराचे तीन भाग करून त्यासाठी तीन पथके तयार केली आहेत. त्या प्रत्येक पथकाला 25 लाखांचे दिवसाचे उद्दिष्ट दिले आहे.
 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Cannot Speak or Walk, Yet Shivprasad Achieves 66% in SSC and Inspires Many
Virmade Fata on Pune-Bengaluru Highway Becomes Accident-Prone Zone
Government to Verify All E-Peek Entries Under Revised Transparency Rules
Simplicity and Memories: Mahadev Jankar Shares Emotional Moments with Shepherds
Marathi News Esakal
www.esakal.com