
शहराच्या गजबजलेल्या भाजी मंडई परिसरातच असा प्रकार राजरोसपणे होत असेल तर शहरासाठी ते फारसे भूषणावह नाही. त्यामुळे पालिकेतील नगरसवेकही त्या सगळ्या प्रकाराकडे कसे पाहतात, हेही पाहवयास हवे, अशी नागरिकांत चर्चा आहे.
कऱ्हाड : पालिकेच्या येथील भाजी मंडईतील गाळ्यात मटक्याचा खुला बाजार चालतो आहे. त्याबाबत काही सामाजिक संघटनांनी पालिकेकडे कारवाईची लेखी मागणी केली आहे. त्याची दखल घेऊन पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी कारवाईसाठी पोलिसांना लेखी निवेदन दिले आहे. वास्तविक मंडई पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर गाळे आहेत. तरीही कारवाई होत नाही.
पालिकेच्या येथील मटण मार्केट बाहेरील जागेत असलेल्या पालिकेच्या शॉपिंग सेंटरमध्ये पालिकेने 12 गाळे बांधले आहेत. ते गाळे लिलावाव्दारे दिले आहेत. त्यापैकी दोन गाळ्यांत बिनधास्त मटक्याचा व्यवसाय सुरू आहे, अशा आशयाची तक्रार पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे आली आहे. या गाळेधारकांवर कारवाईची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. त्यात पालिकेवर आक्षेप घेतानाच कारवाईची मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्याची दखल घेऊन पालिकेनेही कारवाई करावी, अशा लेखी सूचना पोलिसांना केल्या आहेत. पोलिसांना कळविले की जबाबदारी संपली, अशा मानसिकतेतील पालिकेने त्या गाळ्यातील मटका व्यवसायाची चौकशी करण्याची गरज आहे. पालिकेतील नगरसवेकांची त्यावर नक्की भूमिका काय आहे, त्याची स्पष्टता होण्याची गरज आहे.
सातारा पालिकेच्या राजकारणात उदयनराजेंची बेरजेची खेळी
पालिकेच्या गाळ्यातच मटक्याचा व्यवसाय सुरू करणाऱ्या या बुकीला नक्की कोणाची ताकद मिळते आहे, त्याचीही चौकशी होण्याची गरज आहे. त्यासाठी पालिका पदाधिकाऱ्यांनीही पोलिसांकडे तसा आग्रह धरला पाहिजे, असाही मतप्रवाह आहे. शहराच्या गजबजलेल्या भाजी मंडई परिसरातच असा प्रकार राजरोसपणे होत असेल तर शहरासाठी ते फारसे भूषणावह नाही. त्यामुळे पालिकेतील नगरसवेकही त्या सगळ्या प्रकाराकडे कसे पाहतात, हेही पाहवयास हवे, अशी नागरिकांत चर्चा आहे.
गोंदवल्यात संचारबंदी लागू; समाधी मंदिरासह आठवडा बाजार बंद
पालिकेच्या गाळ्यामध्ये अवैध मटका व्यवसाय सुरू आहे, त्याबाबतची लेखी तक्रार आली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी त्या गाळ्यामध्ये तसा प्रकार होत असेल, तर थेट कारवाई करावी, असे लेखी कळवले आहे. त्यानुसार कारवाई होईलही. त्यानंतर त्या गाळेधारकांवर काय कारवाई करता येईल, याचा विचार करण्यात येईल असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी स्पष्ट केले.
भाष्य : स्मरण पानिपतावरील पराक्रमाचे
Edited By : Siddharth Latkar