चर्चा तर हाेणारच! विरोधी गटनेता बनला नगराध्यक्षा, माजी नगराध्यक्षांसह सदस्यांचा सारथी

सचिन शिंदे
Friday, 22 January 2021

सार्वत्रिक निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे पालिकेत जो तो आपली सक्षम बाजू मांडताना दिसत आहे. त्यामुळे मासिक सभा आक्रमक होत आहेत.

कऱ्हाड : लोकशाही आघाडीचे नेते सौरभ पाटील यांनी पालिकेतील महिला सदस्यांच्या रिक्षाचे सारथ्य करत शहरातून फेरफटका मारला. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माजी नगराध्यश्रा श्रीमती शारदा जाधव व महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या स्मिता हुलवान यांच्यासह त्यांनी रिक्षातून मारलेला फेरफटका शहरात विशेष चर्चेचा ठरला आहे. त्याला निमित्त होते दीनदयाळ अंत्योदय योजनेतील वाहन वितरणाचे.
 
पालिकेने राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत येथील संदीप सकटे यांना दीनदयाळ अंत्योदय योजनेतील रिक्षाचे वितरण केले. त्यासाठी विदर्भ कोकण बॅंकेमार्फत अर्थसाह्य झाले आहे. दोन लाख 22 हजारांची रिक्षा घेण्यात आली. या वाहन वितरणप्रसंगी घडलेल्या रिक्षातील फेरफटक्‍याची शहरात चर्चा आहे. सार्वत्रिक निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे पालिकेत जो तो आपली सक्षम बाजू मांडताना दिसत आहे. त्यामुळे मासिक सभा आक्रमक होत आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांनाे! BSNLने तुमच्यासाठी आणलीय खास याेजना

त्यात विरोधी लोकशाही आघाडी आपली भूमिका ठामपणे मांडताना विरोधी पक्षनेते सौरभ पाटील आक्रमक आहेत. या पार्श्वभूमीवर सौरभ पाटील यांनी नगराध्यक्षांसह श्रीमती शारदा जाधव व स्मिता हुलवान यांच्यासह फेरफटका मारला. वाहन वितरण झाल्यानंतर त्यांनी मारलेल्या फेरफटक्‍याची शहरात चर्चा आहे. त्यावेळी लोकशाही आघाडीचे नगरसेवक मोहसीन आंबेकरी, मुख्याधिकारी रमाकांत डाके उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Muncipal Council Sourabh Patil Rohini Shinde Satara Marathi News