Covid Vaccine च्या सुरक्षिततेसाठी 'डीप फ्रीजर'ची गरज; गटनेते राजेंद्र यादवांची प्रशासनाकडे मागणी

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

कऱ्हाड (जि. सातारा) : मिनी लॉकडाउनमुळे छोट्या व्यावसायिकांना पाच हजारांचे मानधन द्यावे. व्यापाऱ्यांवर लादलेले कडक निर्बंध काढून त्यांना दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी. तो प्रस्ताव जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे पाठवण्यासह लसीकरण व कोरोनाच्या उपाययोजनांच्या खर्चास पालिकेच्या विशेष सभेत मंजुरी दिली. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. 

पालिकेची विशेष सभा रद्द झाल्यानंतर कोरोनावरील उपाययोजनांसाठी सायंकाळी पाच वाजता विशेष सभा घेतली. त्यात कोरोना संदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करून त्याच्या खर्चाचा ठराव एकमताने मंजूर झाला. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शहरात उपायांची गरज आहे. लसीकरण, कोरोना चाचणी केंद्र वाढवणे, सामाजिक संस्थांचा सहभाग घेणे, लस घेण्यासाठी जागृतीला मंजुरी मिळाली. निर्बंधामुळे व्यापाऱ्यांवरील अन्यायावरही चर्चा झाली. कोविड तपासणी, उपचार, सुविधा आणि अन्य कामांच्या खर्चाला सभेत एकमताने मंजुरी मिळाली. आरोग्य सभापती विजय वाटेगावकर म्हणाले, "निर्बंध कडक घातले तरी चालतील. मात्र, दुकाने सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठवावा.'' 

सभापती स्मिता हुलवान म्हणाल्या, "लसीकरण केंद्र वाढवणे गरजेचे आहे. तेथे सुविधा महत्त्वाच्या आहेत. उपलब्ध केंद्रावर गर्दी आहे. लसीकरणकरणानंतर रिऍक्‍शन आल्यास उपजिल्हा रुग्णालयामध्ये बेड राखीव ठेवले आहेत.'' गटनेते राजेंद्र यादव म्हणाले, लस सुरक्षित राहावी, यासाठी डीप फ्रीजरची गरज आहे. फ्रीज विकत घेण्यासाठी पालिकेकडून आर्थिक तरतूद करणे आवश्‍यक आहे. लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील म्हणाले, कोरोना काळातच डॉक्‍टर्स पुढाकार घेतील.'' फारूक पटवेकर यांनी डॉक्‍टर व नर्सेस यांचे मानधन निश्‍चित करा म्हणजे वैद्यकीय स्टाफची माहिती घेता येईल, असे मत मांडले. यावेळी उपाध्यक्ष जयवंत पाटील, बांधकाम सभापती हणमंत पवार, नगरसेवक विनायक पावसकर, सुहास जगताप यांनीही चर्चेत सहभाग घेतला. 

मानधन देऊन वैद्यकीय स्टाफ नेमणे गरजेचे : मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी लसीकरण व टेस्टिंग सेंटर वाढवणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी आवश्‍यक डॉक्‍टर्स व नर्सची कमतरता आहे. यासाठी मानधन देऊन वैद्यकीय स्टाफ नेमणे आवश्‍यक आहे, असे स्पष्ट केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com