esakal | माझी वसुंधरा पुरस्काराला कऱ्हाडची गवसणी; राज्यात पालिकेचा दुसरा क्रमांक
sakal

बोलून बातमी शोधा

Karad Municipality

माझी वसुंधरा पुरस्कारात पालिका गटात 222 पालिकामध्ये कऱ्हाड पालिकेने राज्यात दुसऱ्या क्रमांकाला गवसणी घातली.

माझी वसुंधरा पुरस्काराला कऱ्हाडची गवसणी; राज्यात पालिकेचा दुसरा क्रमांक

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : माझी वसुंधरा पुरस्कारात पालिका गटात 222 पालिकामध्ये कऱ्हाड पालिकेने (Karad Municipality) राज्यात दुसऱ्या क्रमांकाला गवसणी घातली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) माझी वसुंधरा अभियान (Vasundhara Abhiyan Competition) पुरस्कार सोहळा आज ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. यावेळी या पुरस्काराची घोषणा करुन त्याचे वितरणही झाले. (Karad Municipality Came Second In The Vasundhara Abhiyan Competition In Maharashtra Satara Positive News)

मुंबईत हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती. कऱ्हाडहून नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, उपाध्यक्ष जयवंत पाटील, जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, विनायक पावसकर, मुख्याधिकारी रमाकांते डाके, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी ऑनलाइन सहभाग घेतला होता.

हेही वाचा: भारीच! स्ट्रॉबेरीच्या महाबळेश्वरात उगवणार इंडोनेशियाचा निळा भात

दरम्यान, पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामपंचायत, नगरपंचायत, पालिका व महापालिका अशा स्तरावरील निकाल जाहीर करण्यात आला. त्यात कऱ्हाड पालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक आला असून मागील वर्षी कऱ्हाड पालिका पहिल्या क्रमांकावर होती. या वर्षी स्पर्धेचे निकष बदलून झालेल्या स्पर्धेतही कऱ्हाड पालिकेला पहिल्या तीन क्रमांक टिकवण्यात यश आले आहे. कऱ्हाड पालिकेशिवाय हिंगोली पालिकेचा पहिला, तर जामनेर (जि. जळगाव) पालिकेचा तिसरा क्रमांक आला आहे. पालिकेचा निकाल जाहीर होताच पालिकेत कर्मचाऱ्यांनी आनंद साजरा करत फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच नगरपंचायत गटाचेही निकाल जाहीर झाले असून यात कऱ्हाड तालुक्यातील मलकापूर पालिकेचा नगरपंचायत गटात तिसरा क्रमांक आला आहे.

Karad Municipality Came Second In The Vasundhara Abhiyan Competition In Maharashtra Satara Positive News

loading image
go to top