पृथ्वीराज चव्हाण यांच्या ट्विटची होतीय चर्चा

सचिन शिंदे
Saturday, 29 August 2020

स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या स्पर्धेत कऱ्हाड पालिकेने सलग दुसऱ्यांदा देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरात पालिकेने उत्तम कामगिरी केली आहे. त्या सर्वांचे अभिनंदन, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे. 

कऱ्हाड (सातारा) : स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या स्पर्धेत कऱ्हाड पालिकेने सलग दुसऱ्यांदा देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरात पालिकेने उत्तम कामगिरी केली आहे. त्या सर्वांचे अभिनंदन, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे. 

 

पालिकेत नगराध्यक्षा भाजपच्या आहेत. उपाध्यक्ष भाजपचे समर्थक आहेत. तर सत्तेतील जनशक्ती आघाडी पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून दुरावलेली आहे. अशा स्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करून प्रत्येकाचे अभिनंदन केल्याची शहरात चर्चा आहे. 

आमदार चव्हाण यांनी त्यानिमित्त केलेल्या ट्विटमध्ये सर्वांचेच अभिनंदन केले आहे. त्यात शहरातील नागरिक, सर्व नगरसेवक, पालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह माजी मुख्याधिकारी यशवंत डांगे, विद्यमान मुख्याधिकारी रमाकांत डाके, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपाध्यक्ष जयवंत पाटील यांचे अभिनंदन केले आहे. त्यावेळी कऱ्हाडच्या जनतेचे विशेष आभार मानले आहेत. कऱ्हाडकर नागरीकांच्या सहकार्यामुळेच पालिकेला बहुमान मिळाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Municipality has got the first number in the country in the clean survey competition