esakal | नगराध्यक्षांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय का?; कॉंग्रेसचा हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

नगराध्यक्षांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय का?; कॉंग्रेसचा हल्लाबोल

कऱ्हाड नगरपालिकेवर नामुष्की यावी, असा डाव नगराध्यक्षांनी आखला आहे. मात्र, कऱ्हाडच्या विकासाच्या आड येणाऱ्यांची कोणत्याही प्रकारची गय कऱ्हाडची जनता करत नाही. कऱ्हाडची जनता स्वाभिमानी आहे. जनतेच्या स्वाभिमानाचा जर कोणी अनादर करत असेल त्याला त्याच्या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे नगरसेवक राजेंद्र माने यांनी स्पष्ट केले.

नगराध्यक्षांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय का?; कॉंग्रेसचा हल्लाबोल

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात कऱ्हाड पालिका स्वच्छ सर्वेक्षणात दोन वेळा देशात प्रथम आली. मात्र, त्याचा विधानसभा निवडणुकीतील प्रचारात कोठेच फायदा झाला नाही. त्यामुळे यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात कऱ्हाड मागे पडावे, पालिकेवर नामुष्की यावी, असा डाव कऱ्हाडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांनी आखला आहे. त्यामुळेच त्या ठरावावर स्वाक्षऱ्या करत नाहीत, असा आरोप कॉंग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक राजेंद्र ऊर्फ आप्पा माने व नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी केला. 

श्री. माने म्हणाले, "यावर्षी नगरपालिकेवर नामुष्की यावी, असा डाव नगराध्यक्षांनी आखला आहे. मात्र, कऱ्हाडच्या विकासाच्या आड येणाऱ्यांची कोणत्याही प्रकारची गय कऱ्हाडची जनता करत नाही. कऱ्हाडची जनता स्वाभिमानी आहे. जनतेच्या स्वाभिमानाचा जर कोणी अनादर करत असेल त्याला त्याच्या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. कॉंग्रेस पक्ष नैतिक विचारांचा पक्ष आहे. त्याच नैतिकतेला जपत कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विचारांनी चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. म्हणूनच आमची भूमिका कऱ्हाडच्या विकासाशी बांधिल आहे. त्यात कोणी जनतेच्या भावनांशी खेळत असेल तर योग्यवेळी उत्तर नक्कीच मिळेल.''

स्वच्छ सर्वेक्षणावरुन कऱ्हाडात राजकीय वातावरण तापले! 

पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना नगराध्यक्षांसह नगरसेवकांना पत्र पाठवून सभागृहातील ठराव वेळेवर प्राप्त होत नाहीत, असे सांगण्याची वेळ का आली, याचा विचार सर्वांनीच करावा. मुख्याधिकाऱ्यांना अशा प्रकारे हतबल करण्यात कोणाचा स्वार्थ आहे, याचाही खुलासा व्हावा. ठरावांवर सह्या वेळेत झाल्या नाहीत, तर दोन वेळा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात पहिला नंबर प्राप्त नगरपालिका या वेळी सहभागसुद्धा घेऊ शकणार नाही, अशी चिंता व्यक्त करण्याइतपत वेळ गेली आहे का, विधानसभेत जनतेने नाकारलेल्या उमेदवाराच्या सांगण्यावरून ठरावांवर सह्या वेळेत केल्या नाहीत का, याचाही खुलासा व्हावा, असे त्यांनी सांगितले. 

जनशक्तीवरही टीका 

राजकीय व वैयक्तिक हेवेदाव्यासह स्वार्थासाठी शहराच्या विकासाला व लौकिकाला हानी पोचविणे घृणास्पद आहे. नगराध्यक्षांसह सत्ताधारी नागरिकांच्या भावनांशी खेळत आहेत. तो त्यांनी थांबवावा. केवळ ठरावावर स्वाक्षऱ्या नाहीत म्हणून स्वच्छ सर्वेक्षणात जर सहभागच घेतला जात नसेल तर तो घोर अपराध असेल. त्याला नगराध्यक्षा व जनशक्ती सत्ताधारी आघाडी सर्वस्वी जबाबदार असतील, असा आरोप नगरसेवक माने व नगरसेवक गुजर यांनी केला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top