esakal | Don't Worry : आता घरपोच मिळणार साहित्य, 'ऑनलाइन शॉपिंग'साठी पालिकेचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

Online Shopping

स्थानिक व्यवसाय, सेवा व सर्वच गोष्टींचा समावेश करून अॅप विकसित करणारी जिल्ह्यातील कऱ्हाड ही पहिली पालिका ठरणार आहे.

Don't Worry : आता घरपोच मिळणार साहित्य

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (सातारा) : ऑनलाइन शॉपिंगमध्ये (Online Shopping) बहुतांशी नागरिक खरेदी करत आहेत. कोरोना काळात (Coronavirus) तीच ऑनलाइन शॉपिंग अत्यंत महत्त्वाची व गरज भागवणारी ठरली. त्यामुळे ती जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच साहित्याच्या खरेदीसाठी सुलभ व्यवस्था करून त्यात स्थानिक सर्व प्रकारच्या सेवा, व्यावसायिकांच्या सहभागातून नागरिकांना घरपोच सेवा देण्यासाठी पालिकेच्या पुढाकाराने येथे एक अॅप (Online Shopping App) विकसित करण्यात येत आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके (Chief Officer Ramakant Dake) यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याची प्राथमिक स्तरावर जोरात तयारी सुरू आहे. सर्वसाधारण सभेत त्याला मंजुरीही घेण्यात येणार आहे. (Karad Municipality Will Launch Online Shopping App Satara Marathi News)

स्थानिक व्यवसाय, सेवा व सर्वच गोष्टींचा समावेश करून अॅप विकसित करणारी जिल्ह्यातील कऱ्हाड ही पहिली पालिका (Karad Municipality) ठरणार आहे. शहरातील सर्वच व्यापाऱ्यांचा या अॅपमध्ये समावेश असणार आहे. अॅपमध्ये सेवा, व्यावसायिक, इव्हेन्ट मॅनेजमेंट अशा अनेक प्रकाराच्या सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचे प्राथमिक टप्प्यातील काम पालिकेत आकार घेत आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टीत नियमबद्धता आली. नवे विचारही पुढे आले आहेत. त्याच माध्यमातून शहरातील नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंसह अन्य सेवाही सहज उपलब्ध करून देण्यासह त्याचा आपत्कालीन काळात अधिक गतीने वापर करता येईल, असे अॅप पालिका विकसित करत आहे.

हेही वाचा: सेल्फीच्या नादात तरुण 600 फूट दरीत कोसळला

अॅप सर्वांसाठी खुले असणार आहे. त्यामध्ये शहरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांसह घाऊक व्यापाऱ्यांच्याही समावेश असेल. त्यांचे अॅपमध्ये क्रमांक नोंदवले जातील, त्यावर नागरिकांनी हव्या असलेल्या साहित्याची ऑर्डर टाकल्यास त्यांना घरपोच साहित्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांची अत्यंत चांगली व्यवस्था होणार आहे. ऑनलाइन बाजारपेठेच्या काळात पालिकेने त्याच प्रकारचे अॅप विकसित करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

हेही वाचा: 'गोल्ड ट्रेडिंग'मधून 74 लाखांची फसवणूक

अॅप तयार करताना किती डाटा लागणार, सुलभ व्यवस्था कशी करता येईल, कोरोनासारख्या आपत्कालीन स्थितीत ते अॅप अधिक सुलभपणे वापरता आले पाहिजे, या सगळ्याचा विचार करून अॅप तयार होईल. त्याला पालिकेच्या मासिक बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर ते खुले केले जाणार आहे.

-रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड

Karad Municipality Will Launch Online Shopping App Satara Marathi News

loading image