
मलकापूर : कंटेनरची मोटारीला धडक होऊन झालेल्या अपघातात ड्यूटीवर निघालेले पोलिस कर्मचारी जखमी झाला. यात मोटारीचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. पुणे- बंगळूर आशियायी महामार्गावर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. विकास चंद्रकांत संकपाळ (रा. मलकापूर, ता. कऱ्हाड) असे जखमी हवालदाराचे नाव आहे.