
कऱ्हाड : शहरात मोठ्या गगनचुंबी इमारती उभ्या राहात आहेत. त्यात अनेक इमारतींमध्ये अनधिकृत बांधकाम होत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे होत आहेत. पालिकेने त्या अनुषंगाने सर्व्हेही सुरू केला आहे. मात्र, यापूर्वीच्या अवैध बांधकामावरही पालिकेची कारवाई कासवगतीने सुरू आहे. २००० नंतर २००१ व त्यानंतर २०१९ अशा केवळ तीन वेळीच कारवाई झाली. त्या वेळी पालिकेला न्यायालयाचा आदेश आल्यानंतरच कारवाई झाल्याचेही वास्तव आहे. त्यामुळे पालिकेने स्वतःहून फारशा कारवाया केल्याचे दिसत नाही. त्यामागे बरीच कारणे असली, तरी अनेक राजकीय व्यक्तींसह बिल्डर्स, व्यापारी, उद्योजकांचाही अवैध बांधकामात समावेश आहे. त्या सगळ्यांच्या अनधिकृत बांधकामावर केव्हा हातोडा पडणार, त्याची उत्सुकता आहे.