Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी आणखी एक महत्त्वाचा पर्यायी मार्ग लवकरच उपलब्ध होणार आहे.
jayant Patil

jayant Patil

sakal

Updated on: 

कऱ्हाड - पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी आणखी एक महत्त्वाचा पर्यायी मार्ग लवकरच उपलब्ध होणार आहे. पंकज हॉटेलच्या पाठीमागील बाजूने जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावरून शहरात येण्यासाठी सुमारे ४० फुटी रस्ता करण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी यांनी आज प्रस्तावित रस्त्याची पाहणी करून प्राथमिक मोजणी केली. त्यामुळे महामार्गावरून शहरात येताना होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कऱ्हाडकरांना पर्यायी मार्ग उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com