
बांधकाम विभागाच्या विशेष विभागाचे सहाय्यक अभियंता ए. जे. हुद्दार, शाखा अभियंता प्रमोद मोटे यांच्या उपस्थितीत रविवार सायंकाळपासुन
जून्या काेयना पूलावरुन वाहतुक सुरु हाेणार का याची तपासणी करण्यात येत आहे.
कऱ्हाड : येथील जुन्या कोयना पुलावरुन किती क्षमतेची वाहने जावु शकतात याच्या तपासणीस प्रारंभ झाला आहे. त्यासाठी मुंबईहुन वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेचे प्रा. अभय बांबोले यांच्यासह कऱ्हाडच्या इंजिनीयरींग कॉलेजचे पथक दाखल झाले आहे. संबंधित पुलावर अवजड डंपर लावुन पुलाच्या क्षमतेची तपासणी केली जात आहे. त्यासाठी पुलाच्या खाली अत्याधुनिक वजन मापक यंत्रणा बसवली आहे. त्याव्दारे 24 तास दर तासांच्या वजनाच्या नोंदी घेतल्या जात आहेत.
येथील जुना कोयना पूल ब्रिटिशांनी उभारला आहे. तो पूल लोखंडी आहे. त्या पुलावरून कऱ्हाड कोकणाशी जोडले गेले आहे. ब्रिटिशांनी कोकणातील संपर्कासाठी तो पूल उभारला. ब्रिटिशांच्या नंतरही नवीन कोयना पूल होईपर्यंत तो पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी सुरूच होता. मात्र, काही कालावधीनंतर तो पूल वाहतुकीस धोकादायक बनला होता. त्यामुळे 1991 च्या दरम्यान त्या पुलावरील मोठ्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर त्या पुलावरून दुचाकीचीच फक्त वाहतूक सुरू होती. त्यानंतरही गेल्या तीन ते चार वर्षांत या पुलाचा सहाव्या क्रमांकाचा पिलर खचला होता. त्यामुळे त्या पुलावरील वाहतूक धोकादायक बनली होती. त्यामुळे सुमारे दोन ते अडीच वर्षे त्या पुलाच्या पिलरचे व अन्य दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे त्या पुलावरील वाहतूक पुणे- बंगळूर महामार्गावरून वळवली होती.
पुलाची दुरुस्ती झाल्यानंतर पुलावरून हलक्या वजनाच्या चारचाकी आणि रिक्षांची वाहतूक होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्या पुलावरून फक्त दुचाकींचीच वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. आता या पुलावरून हलक्या वजनाच्या चारचाकी आणि रिक्षांची वाहतूक होऊ शकते का, याची तपासणी बांधकाम विभागाकडून सुरु करण्यात आली आहे.
बांधकाम विभागाच्या विशेष विभागाचे सहाय्यक अभियंता ए. जे. हुद्दार, शाखा अभियंता प्रमोद मोटे यांच्या उपस्थितीत रविवार सायंकाळपासुन सुरु झाली. त्यासाठी मुंबईहुन वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेचे डॉ. अभय बांबोले, प्रथमेश भोईर, प्रशांत बावीसकर, कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रीकीचे प्रा. प्रफुल्ल देशपांडे यांचे पथक कार्यरत आहे. त्यांना प्रवीण पवार सहकार्य करत आहे.
कऱ्हाडच्या जुन्या कोयना पुलाची वजन क्षमता तपासणी रविवारी रात्रीपासुन सुरु झाली आहे. ती 24 तास केली जाणार आहे. त्याच्या अहवालानंतर पुलावरुन हलकी चारचाकी वाहने नेण्यासंदर्भात निर्णय़ होईल.
ए. जे. हुद्दार, सहायक अभियंता, बांधकाम विभाग, कऱ्हाड.
दैव बलवत्तर म्हणूनच बचावलो! सातारा- सोलापूर बस चालकाने सांगितली दगडफेकीची थरारक कथा
ठरलं तर! वाहतूक शाखा, सातारा पालिका राबविणार अतिक्रमण हटाव मोहीम
नकारात्मकतेतून सकारात्मकतेसाठी सुफिया खानची सहा हजार किलोमीटरची सद्भावना दौड
कोकण- पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा ऐतिहासिक कोकणद्वार पाडणार
Edited By : Siddharth Latkar