फेसबुकवर जमली यारी अन् दरोड्याची झाली तयारी!

सचिन शिंदे
Friday, 18 September 2020

दरोडा टाकण्याचा कट विकीने रचला. मात्र, पंपावरील सीसीटीव्हीने त्यांचा घात केला. सगळ्यांच्या तोंडाला मास्क होते. मात्र, विकीची कऱ्हाड पोलिसांनी ओळख पटली. त्या वेळी पोलिसांनी विकीचा माग सुरू केला. तब्बल चार तासांचे ऑपरेशन राबविल्यानंतर पोलिसांनी दरोड्यातील संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केल्यावर वेगवेगळी माहिती समोर येत आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : प्रत्येकाला 15 हजारांची नोकरी देतो कऱ्हाडला या, असे सांगून उत्तर प्रदेशातील पाचही युवकांना येथील पोलिस रेकॉर्डवरील संशयित विकी सोनवणेने बोलवले. पाचही युवक येथे आल्यानंतर त्यांना नोकरी न देता गुन्हेगारीकडे वळवले. त्यांना दरोड्यासाठीही त्याने वापरले. त्यामुळे शिवडेच्या पेट्रोलपंपावरील दरोड्यातील ब्रेन विकी बनसोडे आहे, असे तपासात पुढे येत आहे. पाचही उत्तर प्रदेशातील युवकांशी सोनवणेचे फेसबुकवरील मित्र आहेत. केवळ नोकरी मिळेल, याच हेतूने ते येथे आले अन्‌ गुन्हेगार बनले आहेत, अशीही माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे सोनवणेने त्यांना नोकरीसाठी बोलावले अन्‌ दरोड्यासाठी वापरले आहे.
 
शिवडे येथील पेट्रोल पंपावरील दरोड्यात सहा जणांची टोळी कऱ्हाड पोलिसांनी विद्यानगरच्या वैभव कॉलनी येथे काल पोलिसांनी फिल्मी स्टाइलने पकडली. सहाही संशयित भाड्याच्या खोलीत राहात होते. सारेच एकाच वेळीत खोलीत असताना पोलिसांना छापा टाकला. त्यात पोलिस रेकॉर्डवरील स्थानिक संशयित विकी ऊर्फ मन्या नंदकुमार बनसोडेसह उत्तर प्रदेशातील अनुभव सुरेंद्र मिश्रा, उमजा सुमितसिंग सिंग, सुमितसिंग मालसिंग सिंग, वीरप्रताप सिंग, महादेव सिंग, शुभम मनोज सिंग यांना पोलिसांनी अटक केली. तो गुन्हा उंब्रज पोलिसांचा आहे. त्यामुळे रात्रीच संशयित उंब्रज पोलिसांकडे वर्ग केले आहेत. त्या संशयितांना सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. 

आंदोलन भोवले! पश्चिम महाराष्ट्रातील तेवीस कलाकारांवर गुन्हा

विकी व उत्तर प्रदेशातील पाचही संशयित फेसबुकवरील मित्र आहेत. त्यानंतर त्यांनी एकमेकांना फोनवरून संपर्क साधला होता. बोलणे वाढल्यानंतर विकीने त्यांना कऱ्हाडला येण्याची ऑफर दिली. पोलिसांच्या तपासात माहिती पुढे आली आहे. त्यानुसार ते पाचही संशयित कऱ्हाडला आले. ते येण्यापूर्वी विकीने त्यांना प्रत्येकी 15 हजारांची नोकरी देतो, अशी कबुली दिली होती. मात्र, त्यांना नोकरी देण्याऐवजी विकीने त्यांना गुन्हेगारीची मार्ग दाखवला. शिवडेचा पेट्रोल पंप लुटण्याची त्यांची मानसिकता केली. मात्र, ते पहिलाच दरोड्याला ते पोलिसांच्या हाती लागले. 

पोलीस भरती रद्द करा; सातारचे राजे सरकारवर भडकले!

दरोडा टाकण्याचा कट विकीने रचला. मात्र, पंपावरील सीसीटीव्हीने त्यांचा घात केला. सगळ्यांच्या तोंडाला मास्क होते. मात्र, विकीची कऱ्हाड पोलिसांनी ओळख पटली. त्या वेळी पोलिसांनी विकीचा माग सुरू केला. तब्बल चार तासांचे ऑपरेशन राबविल्यानंतर पोलिसांनी दरोड्यातील संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केल्यावर वेगवेगळी माहिती समोर येत आहे. त्या वेळी त्यांनी नोकरी मिळेल, म्हणून येथे आल्याची कबुली त्यांनी पोलिसांजवळ दिली. त्यामुळे पोलिसही आवाक्‌ झाले आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Police Arrested Six People Satara News