

कऱ्हाड : शहर पोलिसांनी शहर व ओगलेवाडी परिसरातून चार दिवसांपूर्वी एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून तिघा संशयिताकडून सुमारे १० ग्रॅम ड्रग्ज जप्त केले होते. ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे राजधानीपर्यंत असल्याची शंका आल्याने पोलिसांची तीन पथके मुंबईसह इतर ठिकाणी रवाना करण्यात आली होती.