कराड : सातारा जिल्ह्याचे सुपुत्र माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे नातू आणि रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव आदिराज पाटील (Adiraj Patil) यांची कऱ्हाड (जि. सातारा) येथील कोयना सहकारी बँकेच्या (Koyana Bank Director) संचालपदी निवड झाली. सहकारी संस्थांचा आदर्श घालून दिलेल्या (कै) उंडाळकर यांच्या नातवाची पहिल्यांदाच या निमित्ताने सहकारी संस्थेत एन्ट्री झाली आहे.