कऱ्हाड दक्षिणेत कॉँग्रेसला दोन धक्के बसत आहेत, तरीही कॉँग्रेसकडून त्यावरही काहीही टिपण्णी नाही. त्याचीही चर्चा आहे. सगळ्या घडामोडींवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अद्याप जाहीर वक्तव्ये केलेले नाही.
कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे (Sahyadri Cooperative Sugar Factory) निवडणुकीचे रणांगण सुरू असतानाच कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसला धक्क्यावर धक्का बसत आहे. काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Adv. Udaysinh Patil-Undalkar) राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करत आहेत. त्या पाठोपाठ विंग जिल्हा परिषेदेचे काँग्रेसचे नेते शंकरराव खबाले (Shankarrao Khabale) यांचाही भाजप प्रवेश आहे.