कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Sahyadri Cooperative Sugar Factory Election) आज (शनिवार) सकाळी आठ वाजता मतदानास उत्साहात प्रारंभ झाला. सह्याद्री कारखान्याची यावेळीची निवडणूक तिरंगी होत असल्यामुळे मतदान चुरशीने होणार आहे. आज सकाळी आठ ते दहा या दोन तासांत 19.14 टक्के मतदान झाले असून 32 हजार 205 मतदारपैकी सहा हजार 165 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.