
Satara Crime: प्रकरणातून युवतीवर कोयत्याने हल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्या एका संशयिताला शहर पोलिसांनी प्रसंगावधान राखत कारवाई गजााड केले. पोलिस वेळेत पोचल्याने अनर्थ टळला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही शहर पोलीस ठाण्यात सुरू होती.
पोलिसांनी सांगितले की, प्रेम प्रकरणातून एका युवतीवर प्राणघातक हल्ला करणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार मोहसीन मोमीन, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांना मिळाली होती.