Plane
sakal
- सचिन शिंदे
कऱ्हाड - पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळण आणि वैमानिक प्रशिक्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरलेले कऱ्हाड विमानतळ मोठ्या ताकदीने आकाशात झेपावण्यासाठी सज्ज झाले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) घेतलेल्या एका निर्णयामुळे कऱ्हाडला लवकरच दुसरी नवीन उड्डाण शाळा (एफटीओ) मिळणार आहे.