Uday Singh Patil Victory : भोसलेंनी फेडला उंडाळकरांचा पैरा! कृष्णा कारखान्यातील मदतीची जिल्हा बॅंकेतील विजयाने परतफेड, कराडमध्ये राजकीय समीकरणं बदलणार?

Uday Singh Patil-Udalkar Wins Karad Society Group Election : सातारा जिल्हा बँकेच्या कऱ्हाड सोसायटी गटात उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी धनंजय पाटील-आटकेकर यांचा पराभव केला. भोसले गटाच्या पाठिंब्यामुळे उंडाळकरांचा विजय निश्चित झाला.
Uday Singh Patil-Udalkar Wins Karad Society Group Election

Uday Singh Patil-Udalkar Wins Karad Society Group Election

esakal

Updated on: 

कराड : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कऱ्हाड सोसायटी गटातील लढतीने तालुक्यातील भोसले-उंडाळकर गटाच्या ताकदीवर शिक्कामोर्तब झाले. रयत संघटनेचे प्रमुख ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी भाजपचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष धनंजय पाटील-आटकेकर यांचा ५५ मतांनी पराभव करून जिल्हा बॅंकेत एंट्री केली. कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले यांची मिळालेली साथ उंडाळकरांच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरली. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत उंडाळकर गटाने केलेला मदतीचा पैरा जिल्हा बँकेतील विजयाच्या रूपाने भोसले गटाने फेडल्याचेच या निकालातून स्पष्ट झाले.

Loading content, please wait...

Related Stories

Satara District Bank Election Result
Karad Society Group Election Sees Political Show of Strength by Udaysingh Undalkar and Dhanaji Patil During Voting
Satara District Bank Polls Enter Final Phase as Senior Leaders Withdraw Nine Seats Go Unopposed and 12 Seats Face Competition
New Political Equation in Karad Cooperative Politics