कऱ्हाड : विधानसभा निवडणुकीसाठी कऱ्हाड उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँटेकी टक्कर झाली. या लढतीत आलेल्या अपयशामुळे दक्षिणमधील कॉंग्रेस आणि उत्तरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आत्मचिंतनात गुंतले आहेत. .Sanjay Patil murder Case : संजय पाटील खून प्रकरणात लाखाची नुकसान भरपाई.पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्येदेखील कोणी फसवले, कोणी फायदा घेतला, माणसे कोणी फोडली, मतदानाच्या आधी दोन दिवस नेमके काय घडले, कोण विकले गेले या सर्व गोष्टींचा हिशेब केला जात आहे. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत दोन्ही मतदार संघात भाजपने बाजी मारली आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार तयारी करूनही त्यांना विजयी पल्ला गाठता आला नसल्याने दोन्ही पक्षांकडून मतांची गणिते केली जात आहेत. दोन्ही मतदार संघातील बुरुज ढासळल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मोठे दुःख झाले आहे..कऱ्हाड दक्षिण मतदार संघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दहा वर्षे आमदार म्हणुन काम करत होते. त्या कालावधीत त्यांनी रस्ते, पाणी, आरोग्यासह अन्य विकास कामे मार्गी लावली. त्याचबरोबर ते मुख्यमंत्री असताना पायाभुत विकास कामे केली आहेत. त्या कामांच्या जोरावर श्री. चव्हाण हे निवडणुकीला सामोरे गेले. त्या विकासकामांच्या जोरावर श्री. चव्हाण यांना १५ हजारांचे मताधिक्य अपेक्षित होते. मात्र त्या तुलनेत भाजपचे डॉ. अतुलबाबा भोसले हे मोठ्या मताधिक्याने पुढे गेले. श्री. चव्हाण यांना त्यांची कर्मभुमी असलेल्या कऱ्हाडनेही फारशी साथ दिली नसल्याचे मतांच्या आकडेवारीवरुन दिसुन आले आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातुनही त्यांना अपेक्षीत मते मिळाली नाही. मात्र कृष्णाकाठच्या कार्वे, वडगाव हवेली, रेठरे बुद्रुक विभागाने डॉ. भोसले यांना साथ दिली. श्री. चव्हाण यांना दक्षिणमधील हक्काच्या येळगाव, वारुंजी, मलकापुर येथुनही अपेक्षीत साथ मिळाली नाही. त्यामुळे आता नेमके काय चुकले याबाबत काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आत्मपरीक्षण करण्यात गुंतले आहेत..कऱ्हाड उत्तर मतदार संघाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील हे गेले २५ वर्षे विधानसभेत प्रतिनिधीत्व करत होते. मागील पंचवार्षिकमध्ये गेली अडीच वर्षे ते सहकार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यादरम्यान त्यांनी विकास कामे केली. त्यांनी केलेल्या विकास कामांतुन त्यांनी मतदार संघावर पकड घेतली होती. ती विकास कामे घेवुन ते निवडणुकीला सामोरे गेले. त्यांच्या विरोधात भाजपचे मनोज घोरपडे हे निवडणुकाला सामोरे गेले. त्यांनी पहिल्या फेरीपासुन मताधिक्य घेतले. केवळ दोन फेऱ्यांचा अपवाद वगळता त्यांना चोवीस फेऱ्यात दोन ते अडीच हजारांच्या फरकाचे मताधिक्य राहिले. त्यामुळे तेथे भाजपच्या घोरपडे यांचा दणणीत विजय झाला. मात्र बाळासाहेब पाटील गटाला त्यांच्या हक्काच्या जिल्हा परिषद गटात आणि सह्याद्री कारखाना कार्यक्षेत्र असलेल्या गावातच मतदानाची अपेक्षीत टक्केवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्याही अपेक्षांवर निवडणूक निकालानंतर पाणी फिरले. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून कुठे कमी पडलो, नेमके काय चुकले? याचे चिंतन सुरु आहे..Karad Accident : मलकापुरात दुचाकीच्या धडकेत तरुण ठार; कुटुंबीयांच्या डोळ्यासमोरच अपघात .वाढलेल्या मतांधिक्याचीच चर्चाकऱ्हाड उत्तर आणि दक्षिण मतदार संघात मोठ्या चुरशीने मतदान झाले. त्या दोन्ही मतदार संघात कॉंटे की टक्कर होती. जो उमेदवार निवडून येईल तो चार-पाच हजारांच्या मतांनीच निवडुन येईल अशी चर्चा होती. निकालानंतर मात्र उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळाल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे दोन्ही मतदार संघातील उमेदवारांना मिळालेल्या मतांधिक्यांचीच चर्चा गावा-गावात सुरु आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.