
कऱ्हाड : तालुक्यात सापडलेल्या जीबीएसचा रुग्णामुळे तालुक्यातील आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. आरोग्य विभागाकडून तातडीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. तालुक्यातील संबंधित गावातील घरोघरी सर्व्हे करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी दिल्या आहेत. दरम्यान या आजाराबाबत स्पीकरवरून जनजागृती करण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.